Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

Shreyas Iyer on Leading Team India in T20Is: श्रेयस अय्यरला भारतीय टी२० संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याबाबत तो काय म्हणाला, जाणून घ्या.
Shreyas Iyer on Leading Team India in T20Is

Shreyas Iyer on Leading Team India in T20Is

Sakal

Updated on

बीसीसीआयने शनिवारी (६ जून) भारताच्या टी२० संघाचे नेतृत्वबदल जाहीर केले. भारतीय टी२० संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड दौऱ्यावर जायचे आहे. त्यानंतर १ जुलैपासून इंग्लंडमध्ये टी२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतही सामने खेळायचे आहेत. त्यासाठी शनिवारी निवड समितीने संघाचीही घोषणा केली.

यावेळी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) भारताच्या टी२० संघाचा कर्णधार (India's T20I Captain) करण्यात आले, तसेच तिलक वर्माला उपकर्णधार करण्यात आले. मात्र, हे बदल करताना सूर्यकुमार यादवकडून (Suryakumar Yadav) टी२० कर्णधारपद काढून घेण्यासोबतच त्याला संघातूनही वगळण्यात आले आहे.

Shreyas Iyer on Leading Team India in T20Is
Video: टीम इंडियाचं कर्णधारपद गमावलं, पण श्रेयस समोर दिसताच सूर्याने दाखवलं मोठं मन! म्हणाला, 'तो आता नेतृत्व...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com