
आई ही प्रत्येक मुलासाठी त्याच्या सर्वात जवळची व्यक्ती असते. तिच्यापासूनच प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते. भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरही त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. अनेकदा त्याची आई स्टेडियमवरही हजर असते. त्याच्या कारकिर्दीत तिचेही योगदान महत्त्वाचे आहे.
दरम्यान, श्रेयस आणि त्याच्या आईचा एक गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.