

Shreyas Iyer proves fitness despite missing century
Sakal
Shreyas Iyer makes strong comeback after injury: भारताचा वनडे कर्णधार श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन झालं आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला बरगड्यांजवळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तीन महिने क्रिकेट मैदानातून दूर रहावे लागले होते.
त्यानंतर आता त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतून (Vijay Hazare Trophy) क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मंगळवारी (६ जानेवारी) विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध जयपूरमध्ये होत आहे.