IPL 2026: 'आम्ही अजून पण पॉइंट्स टेबलमध्ये नंबर एकच, हेच जास्त...' श्रेयस अय्यर पंजाबच्या सलग दोन पराभवांनंतर नेमकं काय म्हणाला?

PBKS Captain Reacts After Tough Loss Against GT: पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकात पराभूत केले. हा पंजाब किंग्सचा सलग दुसरा पराभव ठरला या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला, जाणून घ्या.
Shreyas Iyer | IPL 2026 | GT vs PBSK

Shreyas Iyer | IPL 2026 | GT vs PBSK

Sakal

Updated on

IPL 2026 Punjab Kings Marathi news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत पहिल्या टप्प्यात अपराजित राहून वर्चस्व दाखवणाऱ्या पंजाब किंग्सची गाडी मात्र विजयी मार्गावरून गेल्या दोन सामन्यात घसरली आहे. पहिल्या ७ सामन्यात ६ विजय पंजाबने मिळवले होते.

तसेच एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे त्यांनी अव्वल क्रमांकावर दावा ठोकला होता. पण नंतर राजस्थान रॉयल्स आणि रविवारी (३ मे) गुजरात टायटन्सकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र असे असले तरी संघाचा विश्वास डळमळीत झालेला नसल्याचे पंजाबचा (Punjab Kings) कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) म्हटले आहे.

Shreyas Iyer | IPL 2026 | GT vs PBSK
IPL 2026: जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सकडून विश्रांती मिळणार? हेड कोचने दिलं धक्कादायक उत्तर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com