IPL 2026: जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सकडून विश्रांती मिळणार? हेड कोचने दिलं धक्कादायक उत्तर

Jasprit Bumrah to be Rested? आयपीएल २०२६ स्पर्धेत ७ पराभवांनंतर आता मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. अशात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाणार का, याबाबात मुख्य प्रशिक्षकांनी भाष्य केले आहे.
IPL 2026

Jasprit Bumrah

Sakal

Updated on

IPL 2026 MI Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) मुंबई इंडियन्स संघ संघर्ष करताना दिसला आहे. पहिल्या ९ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) केवळ २ सामने जिंकू शकले आहेत, तर ७ पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ सध्या ९ व्या क्रमांकावर आहे. तसेच त्यांचे आयपीएल २०२६ स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.

सध्या केवळ गणिती समीकरणानुसार त्यांचे आव्हान जिवंत आहे. यातच मुंबईला सर्वाधिक चिंता सतावत आहे ते वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) फॉर्मची.

बुमराहला आयपीएल २०२६ स्पर्धेत फार काही खास करता आलेले नाही. त्याने केवळ ३ विकेट्स आत्तापर्यंत घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याची मागणी होत आहे. याबाबत आता मुंबईचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी चकीत करणारे विधान केले आहे.

IPL 2026
IPL 2026: हार्दिक, सूर्यकुमारच्या फॉर्मवर लक्ष; मुंबई लखनौमध्ये आज लढत, तळाच्या संघांमध्ये झुंज, पाहा कशी असेल Playing XI
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com