

Shreyas Iyer on Punjab Kings 4th Loss
Sakal
IPL PBKS vs DC news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) सोमवारी (११ मे) पंजाब किंग्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवचा धक्का बसला. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात पंजाब किंग्सला दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ३ विकेट्सने पराभूत केले. पंजाब किंग्सचा हा सलग चौथा पराभव होता. त्यामुळे पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर निराश झाल्याचे दिसला.
खरंतर पंजाब किंग्सने (Punjab Kings) आयपीएल २०२६ स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली होती. पंजाब पहिल्या टप्प्यातील ७ सामन्यांत अपराजित राहणारा एकमेव संघ होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांची कामगिरी घसरली. त्यांनी सलग ४ सामने पराभूत झाले आहेत. चौथ्या पराभवानंतर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चूका झाल्याचे मान्य केले.