

Shreyas Iyer | Priyansh Arya & Cooper Connolly
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत पंजाब किंग्सने अफलातून खेळ आत्तापर्यंत केला आहे. पंजाब एकमेव संघ आहे, जो या हंगामात ६ सामन्यांनंतरही अपराजित आहे. त्यांनी ५ विजय मिळवले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
दरम्यान, रविवारी पंजाबने लखनौ सुपर जायंट्सला ५४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात कुपर कोनोली आणि प्रियांश आर्या (Priyansh Arya & Cooper Connolly) यांनी स्फोटक खेळी करता चौकार षटकारांचा पाऊस पाडला होता. त्याबद्दल सांगताना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) खुलासा केला की षटकारांची स्पर्धा संघात लागली होती.