

Rohit Sharma
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला त्यांचा ६ वा सामना सोमवारी (२० एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
हा सामना स्पर्धेतील आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) महत्त्वाचे आहे. कारण मुंबईने आधीच सलग चार सामने गमावले आहेत. त्यातच त्यांच्यासमोर सलग तीन सामने जिंकून आत्मविश्वास मिळलेला गुजरातचा (Guarat Titans) संघ समोर आहे.
विशेष म्हणजे मुंबईने अहमदाबादमध्ये गुजरातला अद्याप एकदाही पराभूत केलेलं नाही, त्यामुळे मुंबईसमोर ही पराभवाची मालिकाही खंडित करण्याचंही आव्हान आहे. अशातच अनेक चाहत्यांना प्रश्न पडला आहे की रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत महत्त्वाची माहिती मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी दिली आहे.