Shreyas Iyer, Krunal Pandya and other IPL 2026 stars are pushing for a Team India T20 comeback
esakal
IPL 2026 best players for India comeback list: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील श्रेयस अय्यरची ( Shreyas Iyer) कामगिरी पाहून सारे जण त्याच्या ट्वेंटी-२० संघातील पुनरागमनाविषयी चर्चा करू लागले आहेत. काही अहवालानुसार सूर्यकुमार यादवच्या जागी भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवले जाऊ शकते, असेही वर्तवले जात आहे. दिनेश कार्तिकनेही आयपीएलचे पर्व गाजवून अशाच प्रकारे भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले होते. त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही, हेही तितकंच खरं आहे.