भारताने आशिया कप २०२५ साठी फक्त १५ खेळाडूंची निवड केली आहे.
पाकिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँग यांनी १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
श्रेयस अय्यरचा समावेश न झाल्याने वाद आणि नाराजी व्यक्त होत आहे
Why did India choose only 15 players for Asia Cup 2025? : आशिया चषक स्पर्धेसाठी भारत, बांगलादे, हाँग काँग, पाकिस्तान यांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. ८ संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे. पण, या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघावरून अजूनही वाद सुरूच आहे. कारण भारताच्या या संघात श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) नाव नसल्याने नाराजीचा सूर आहे. संघ व्यवस्थापनाला श्रेयसचा संघात समावेश करता आला असता, परंतु काहींचा हट्ट नडला..