

Shubham Dubey
Sakal
IPL 2026 Shubham Dubey story: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने अखेर पंजाब किंग्सचा किल्ला भेदला. मंगळवारी (२८ एप्रिल) राजस्थानने पंजाबला मुल्लनपूरमध्ये झालेल्या सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केले. हा पंजाबचा हंगामातील पहिलाच पराभव ठरला. या सामन्यातील राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या खेळाडूंमध्ये ३१ वर्षीय शुभम दुबेचाही मोठा वाटा आहे.
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शुभम जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा राजस्थानसमोर (Rajasthan Royals) ३६ चेंडूत ७२ धावा करण्याचं मोठं लक्ष्य होतं. पण शुभमने १२ चेंडूतच ३१ धावा फटकावल्या. त्याने डनोवन फरेरासोबत ३२ चेंडूत ७७ धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत पोहचवलं. त्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारानेही कौतुक करताना तो अत्यंत कौशल्यपूर्ण असल्याचे म्हटले.