

Shubman Gill | India vs New Zealand
Sakal
भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा सामना निर्णायक ठरेल.
भारताने (Team India) पहिला सामना जिंकला असल्याने दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंडने (New Zealand) दमदार खेळ करत भारताला पराभूत करत मालिकेतील आव्हान कायम ठेवले.