
Karnataka Beats Punjab: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र, या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात पंजाब संघाला कर्नाटकविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातून शुभमन गिलने पंजाबसाठी रणजीमध्ये पुनरागमन केले.
त्याने या सामन्यात पंजाबचे नेतृत्वही केले, तसेच संघाची लाज राखण्याचा दुसऱ्या डावात शतक करत प्रयत्नही केला. मात्र, त्याचे प्रयत्न अपूरे पडले. कर्नाटकने पंजाबला एक डाव आणि २०७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला