IND vs NZ 1st ODI: ऋतुराज गायकवाड OUT! शुभमन गिलने Playing XIचे दिले संकेत; अक्षर पटेल- लोकेश राहुल यांच्याबाबत होणार टॉस, नेमकी असा असेल संघ?

India vs New Zealand 1st ODI probable playing XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यापूर्वी कर्णधार शुभमन गिलने भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ऋतुराज गायकवाडला पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
India vs New Zealand 1st ODI probable playing XI

Shubman Gill Hints at India Playing XI for 1st ODI Against New Zealand, Ruturaj Gaikwad Set to Miss Out

esakal

Updated on: 

Shubman Gill confirms India's top four for ODI World Cup 2027: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वाखाली भारताने नुकतीच ट्वेंटी-२० मालिका जिंकली आणि आता शुभमन गिलच्या नेतृत्वात वन डे मालिका जिंकण्याचा निर्धार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा हे सीनियर खेळाडू पुन्हा निळ्या जर्सीत दिसणार असल्याने या मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा त्यांचा शेवटचा न्यूझीलंड दौरा असल्याने भावनिक किनारही आहे आणि या दोघांचे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे निश्चित आहे. अशात कर्णधार गिलने पहिल्या वन डे साठीच्या प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

Loading content, please wait...