

Shubman Gill Hints at Playing World Cup 2027 Core XI in New Zealand Series
Sakal
Shubman Gill on India's Likely World Cup Playing XI: शनिवारी (३ ऑक्टोबर) भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या वनडेत ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पण असे असले तरी भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यातील विजयांमुळे ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
दरम्यान, ही मालिका सुरू असतानाच २०२७ वनडे वर्ल्ड कपचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले. भारताचा पहिला सामना ७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
अशात आता भारतीय संघानेही वेस्ट इंडिज मालिकेपासून या स्पर्धेसाठी तयारीला सुरुवात केली आहे. आता भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून तिथेही वनडे मालिका खेळली जाणार आहे. ही मालिकाही भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशात या मालिकेत फारसे प्रयोग करणार नसल्याचे संकेत भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिलने दिले आहेत.