Shubman Gill selected for Punjab Vijay Hazare Trophy squad
esakal
Punjab 18-man squad Vijay Hazare Trophy 2025: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली आणि यात उप कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) याची निवड न झाल्याचे सर्वांना आश्चर्य वाटले. टीम कॉ़म्बिनेशनसाठी हा निर्णय घेतला गेल्याचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर व कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सांगितले. पण, शुभमन आता देशांतर्गत क्रिकेट गाजवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आगामी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या पंजाबच्या १८ सदस्यीय संघात शुभमनसह अभिषेक शर्मा व अर्शदीप यांचे नाव आहे.