

Shubman Gill - Rishabh Pant
Sakal
India vs Sri Lanka Test Series Marathi Updates: भारतीय कसोटी संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे, तर दुसरा सामना कोलंबोमध्ये २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार शुभमन गिलवर (Shubman Gill) सर्वांचेच लक्ष असणार आहे.
त्याने गेल्या काही महिन्यात कसोटीत चौथ्या क्रमांकावर खेळताना दमदार कामगिरी केली होती. वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतर आता फलंदाजीची मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याची कामगिरी भारतासाठी श्रीलंका दौऱ्यातही महत्त्वाची असणार आहे.