IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Sarfaraz Khan vs Dhruv Jurel, Playing XI Debate: भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलला कसोटी मालिकेचा पहिला सामना १५ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये ध्रुव जुरेल की सर्फराज खान, यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची असा पेच आहे.
India vs Sri Lanka 1st Test

Sarfaraz Khan vs Dhruv Jurel, India Playing XI Debate

Sakal

Updated on

India vs Sri Lanka 1st test: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून पहिला सामना गॉलला खेळवला जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय निवड समितीला काही बदल भारतीय संघात करावे लागले आहेत.

साई सुदर्शन दुखापतीतून सावरला नसल्याने त्याच्या जागेवर सर्फराज खानला (Sarfaraz Khan) बदली खेळाडू म्हणून दोन दिवसांपूर्वीच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे सर्फराज भारतीय संघात सामील झाला असून पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनच्या निवडीसाठी उपलब्ध आहे.

India vs Sri Lanka 1st Test
IND vs SL 1st Test: सर्फराज खानची एन्ट्री, पण नाही मिळणार खेळण्याची संधी! पहिल्या कसोटीसाठी कशी असेल भारताची Playing XI?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com