IND vs NZ: शुभमन गिलचा असा अवतार कधी पाहिलाय का? विकेट गेल्यावर नाचला, रनआऊट हुकल्यावर चिडला; पाहा Viral Video

Shubman Gill’s Energetic Reactions on Day 5 in Wellington: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनला सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी शुभमन गिलचा वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. तो विकेट्सनंतर जोशात नाचतानाही दिसला, तर धावबादची संधी हुकल्यानंतर चिडतानाही दिसला.
Shubman Gill Dance | India vs New Zealand 1st Test

Shubman Gill Dance | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टनला रोमांचक कसोटी सामना सुरू आहे. कसोटी मालिकेतील हा पहिला सामना असून सोमवारी अखेरच्या दिवसाचा खेळ होत आहे. शेवटच्या दिवसाचे शेवटचे सत्र बाकी असून भारताला न्यूझीलंडने आघाडी भरून ५ विकेट्स घ्यायच्या आहेत, तर न्यूझीलंड विकेट्स टिकवून फलंदाजी करत सामना वाचवण्यासाठी लढत आहेत.

पाचव्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत भारताकडे १४६ धावांची आघाडी आहे. दरम्यान, पाचव्या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) वेगळ्याच मूडमध्ये दिसला आहे.

Shubman Gill Dance | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, Test: रिषभ पंतचा षटकार ठोकत शतकाचा चौकार! रोहित-गेलला टाकलं मागे अन् आता सचिन तेंडुलकरचा विक्रम धोक्यात
Loading content, please wait...