

Sir Don Bradman
Sakal
SIR DON BRADMAN HISTORIC RECORD: आक्रमक फलंदाजी हा सध्याच्या क्रिकेटमधील एक ट्रेंड झाला आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्येही अनेकदा काही खेळाडू आक्रमक पवित्रा घेतात. इंग्लंड संघाच्या तर या रणनीतीची प्रचंड चर्चाही झाली होती. त्यातही भारताचा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी ज्या वेगात फलंदाजी करतो, त्याने सर्वांनाच प्रभावित केलं आहे.
तो आयपीएलमध्ये ४० चेंडूंच्या आतच शतक करणारा पहिलाच खेळाडू देखील आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ३५ चेंडूत राजस्थान रॉयल्ससाठी केलं आहे. पण असं असलं तरी आक्रमक फलंदाजी ही काही क्रिकेटसाठी नवीन गोष्ट नाही, किंबहुना फार पूर्वीपासून अशाप्रकारे आक्रमक खेळींची नेहमीच चर्चा झाली आहे. अशाचप्रकारची एक खेळी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी केली होती.