
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच १४ जून रोजी दक्षिण आफ्रिकेने जिंकले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे सेलीब्रेशन अजून सुरू असतानाच या स्पर्धेच चौथे पर्व म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेला मंगळवारपासून (१७ जून) सुरुवात झाली.
मंगळवारपासून श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात सुरू झालेल्या कसोटी मालिकेने या स्पर्धेची सुरुवात झाली. पहिला सामना गॉल येथे खेळवला जात आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेची सुरुवात म्हणूनच नाही, एका दिग्गज खेळाडूचा हा अखेरचा कसोटी सामना देखील आहे.