
India vs Ireland Women ODI: भारतीय महिला क्रिकेट संघाची आजपासून (१० जानेवारी) आयर्लंडविरुद्ध वनडे मालिका सुरू झाली आहे. या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात कर्णधार स्मृती मानधनाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे हा सामना झाला. या सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. या मालिकेत हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व मानधना करत आहे.