
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने अनेकांसोबत खेळाडू आणि क्रिकेट प्रशासक म्हणून काम केले आहे. यातील एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे सध्या आयसीसीचे अध्यक्ष असलेले जय शाहा. ते आयसीसीचे अध्यक्ष होण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव होते.
गांगुली आणि जय शाह यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान एकत्र काम केले आहे. २०२२ मध्ये रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष झाले, तर जय शाह २०२४ अखेरीपर्यंत बीसीसीआयचे सचिव होते.