T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

South Africa beat India: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी२० वर्ल्ड कपच्या सुपर-८ फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयी रथ रोखला.
T20 World Cup 2026 | India vs South Africa

T20 World Cup 2026 | India vs South Africa

Sakal

Updated on

South Africa beat India in T20 World Cup Super-8: भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर - ८ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मोठा धक्का दिला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध ७६ धावांनी मोठा विजय मिळवला.

भारताचा या स्पर्धेतील पहिला पराभव आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा सलग पाचवा विजय आहे. यजमान असलेल्या भारतीय संघाच्या पराभवाने आता सुपर - ८ मधील चुरसही वाढली आहे. कारण यानंतरचे सर्व सामने सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १८८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १८.५ षटकात सर्वबाद १११ धावाच करता आल्या.

<div class="paragraphs"><p>T20 World Cup 2026 | India vs South Africa </p></div>
T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com