
दक्षिण आफ्रिका संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. गेल्याच महिन्यात ते कसोटीतील वर्ल्ड चॅम्पियन झाले आहेत. त्यानंतरही त्यांनी त्यांचा दबदबा कायम ठेवल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितितही दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी (१ जुलै) झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ३२८ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बुलावायो येथे झालेल्या या सामन्यातील विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.