
दक्षिण आफ्रिका संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिलेली असताना दक्षिण आफ्रिकेकडून युवा खेळाडू खेळताना दिसत आहेत.
दरम्यान, बुलावायोला सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने १६७ धावांची मोठी आघाडी घेतली आहे. पण असे असले तरी त्यांना पहिल्या डावात झिम्बाब्वेचा ३८ वर्षीय सीन विल्यम्स नडला होता.