
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स २०२५ (WCL 2025) ही स्पर्धा सध्या १८ जुलैपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत शनिवारी (१९ जुलै) वेस्ट इंडिज चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स या संघात बर्मिंगहॅमला रोमांचक सामना झाला.
पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात बरोबरी झाली होती. पण या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये नाही, तर बॉल आऊटने लागला. त्यामुळे सर्वांच्याच २००७ मधील आठवणी ताज्या झाल्या होत्या.
कारण यापूर्वी क्रिकेटमध्ये बॉलआऊट २००७ साली झालेल्या पहिल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत वापरण्यात आले होते आणि विशेष म्हणजे या स्पर्धेत साखळी फेरीत भारताने पाकिस्तानविरुद्ध बॉलआऊटमध्येच विजय मिळवला होता. या बॉलआऊटची बरीच चर्चा झाली होती. आता १८ वर्षांनी पुन्हा एकदा बॉलआऊट पाहायला मिळाला आहे.