Vaibhav Suryavanshi: वैभवची २० दिवसांपूर्वी वर्ल्ड रेकॉर्डची संधी हुकली, पण द. आफ्रिकेच्या फलंदाजाने बाजी मारली; सेम सचिनसाठी खेळी

Vaibhav Suryavanshi missed world record: भारतीय अंडर-१९ क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने २० दिवसांपूर्वी वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी गमावली होती. परंतु, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर जोरिक व्हॅन शाल्कवायकने ही बाजी मारत जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
JORICH VAN SCHALKWYK CREATES HISTORY WITH FIRST DOUBLE CENTURY IN YOUTH ODI
JORICH VAN SCHALKWYK CREATES HISTORY WITH FIRST DOUBLE CENTURY IN YOUTH ODIesakal
Updated on
Summary

दक्षिण आफ्रिकेचा जोरिक व्हॅन शाल्कवायक युवा वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू ठरला.

त्याने झिम्बाब्वेविरुद्ध १५३ चेंडूंमध्ये २१५ धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यात १९ चौकार आणि ६ षटकार होते.

दक्षिण आफ्रिकेने ३८५ धावांचे लक्ष्य दिले आणि झिम्बाब्वेला फक्त १०७ धावांवर गुंडाळले.

Jorich van Schalkwyk First-Ever 200 in Youth ODI Cricket : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर जोरिक व्हॅन शाल्कवायकने युवा वन डे क्रिकेट सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. २० दिवसांपूर्वी भारताचा वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi) या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता, परंतु त्याला अपयश आले. मात्र, काल जोरिकने दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना झिम्बाब्वेविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड केला. युवा वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज बनला. त्याने १५३ चेंडूंत २१५ धावांची वादळी खेळी केली. यात त्याने ६ षटकार व १९ चौकारांच्या मदतीने १४०.५२च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com