
दक्षिण आफ्रिकेने अखेर २७ वर्षांनी पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. शनिवारी (१४ जून) लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर टेम्बा बाऊमाच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिका संघ कसोटीचा जगज्जेता झाला.
गेल्या दोन दशकापासून दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हणून हिणावलं गेलं, पण त्यांनी अखेर शनिवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत हा हा टॅग पुसला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले.