
दक्षिण आफ्रिका संघाने अखेर २७ वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची मानाची गदा जिंकली आहे. शनिवारी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत केले आणि ते कसोटी जगज्जेते झाले.
दक्षिण आफ्रिकेने १९९८ नंतर पहिल्यांदाच आयसीसीचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. यापूर्वी १९९८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या विजयासह त्यांनी चोकर्सचा टॅगही अखेर हटवला आहे.