

U19 South Africa
Sakal
U19 South Africa Team Highest Score Record: १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये सध्या अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. युवा खेळाडू त्यांच्या कौशल्याने प्रभावित करत आहेत. यादरम्यान स्पर्धेच्या सुरुवातीलाच काही विक्रमही झाले आहे.
आता सोमवारी दक्षिण आफ्रिकेच्या युवा संघानेही (U19 South Africa) मोठा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत सोमवारी विंडहोक येथे दक्षिण आफ्रिका आणि तान्झानिया या १९ वर्षांखालील संघात सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सहज विजय मिळवला.