

Vaibhav Suryavanshi | U19 World Cup 2026
Sakal
Vaibhav Suryavanshi World Record in U19 WC: भारताचा युवा संघ सध्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत खेळत असून दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. भारत आणि बांगलादेश या युवा संघातील सामना आज (शनिवारी, १७ जानेवारी) बुलावायो येथे खेळवला जात असून या सामन्यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने छाप पाडली आहे.
ही स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच वैभवची (Vaibhav Suryavanshi) चर्चा होती. त्याने यापूर्वीही त्याच्या स्फोटक फलंदाजीने प्रभावित केले होते. मात्र १५ जानेवारीला अमेरिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला फार काही करता आले नव्हते. मात्र त्याने बांगलादेशविरुद्धच्या (U19 India vs U19 Bangladesh) सामन्यात आपली प्रतिभा पुन्हा दाखवून दिली.