T20 World Cup 2024 : कोणाची फिरकी घुमणार? वर्ल्डकपसाठी टीम इंडियात काट्याची टक्कर, 'हे' 5 स्पिनर आहेत शर्यतीत

Team India: टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाजांच्या जागेसाठी कोणकोणते पर्याय आहेत, याचा घेतलेला आढावा.
India Team Spinners
India Team SpinnersSakal

T20 World Cup 2024 : जून 2024 मध्ये अमेरिका आणि कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) येथे टी20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. 2 जून ते 29 जून दरम्यान हा वर्ल्डकप खेळवला जाणार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राथमिक संघ घोषित करण्याची अंतिम तारिख आहे.

त्यामुळे सर्वच सहभागी संघ या टी20 वर्ल्डकपसाठी संघबांधणीचा विचार सध्या करत आहेत. भारतीय संघातही कोणाला संधी मिळणार, कोणाला नाही याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

अनेक खेळाडू आयपीएलमध्ये छाप पाडून टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील निवडीसाठी दावेदारीही ठोकण्याच्या प्रयत्नात आहेत. यातच आता फिरकी गोलंदाजांच्या जागेसाठीही मोठी स्पर्धा आहे. दरम्यान, टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाजांच्या जागेसाठी कोणकोणते पर्याय आहेत, यावर एक नजर टाकू.

India Team Spinners
PBKS vs MI: मिस्टर ३६० चा कडक शॉट अन् प्रभसिमरनचा भन्नाट झेल! पंजाबविरुद्ध सूर्याचं शतक कसं हुकलं

कुलदीप यादव

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची भारतीय संघातील जागा जवळपास पक्की आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्येही आहे, तसेच त्याची चायनामन गोलंदाजी त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. कुलदीपने 2024 आयपीएलमध्ये 4 सामने खेळले असून 6 विकेट्स घेतल्या आहेत.

युजवेंद्र चहल

आयपीएल 2024 मध्ये फिरकीपटूंमध्ये सध्या सर्वात्तम कामगिरी युजवेंद्र चहल करत आहे. तो यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप तीन गोलंदाजांमध्येही आहे. त्याने 7 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या आहेत.

मात्र गेल्या काही महिन्यांत त्याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याचा विचार भारतीय निवड समीती करणार की नाही, हा प्रश्न आहे. परंतु, त्याची सध्याची कामगिरी पाहाता तो देखील भारतीय संघासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

India Team Spinners
Punjab Kings: 'सरकार उठा आता', MI विरुद्धच्या सामन्यात मराठी सिनेमांचे डायलॉग! पंजाब किंग्जने घातला X वर धुमाकूळ

अक्षर पटेल

अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल हा देखील फिरकीपटूच्या जागेसाठी एक पर्याय आहे. अक्षर अष्टपैलू खेळाडू असल्याने खालच्या फळीत फलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो. याशिवाय तो डावखुरा फिरकीपटू असल्याने ती देखील त्याच्यासाठी जमेची बाजू आहे.

तो यावर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेतही खेळला होता. मात्र अक्षरला अद्याप आयपीएल २०२४ मध्ये अपेक्षित अशी छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे तो ही जागा मिळवण्यात यशस्वी ठरणार की नाही हे पाहावे लागणार आहे.

रवी बिश्नोई

23 वर्षीय फिरकीपटू रवी बिश्नोई गेल्या काही महिन्यांत केलेल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याची गुगली अनेक फलंदाजांना संभ्रमात टाकते. याशिवाय तो गेल्या काही महिन्यात भारतीय टी20 संघात नियमित खेळतानाही दिसला आहे.

त्याला यंदाच्या आयपीएल हंगामात 6 सामन्यांत 4 विकेट्स घेता आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्याने या सहाही सामन्यात किफायतशीर गोलंदाजी केली आहे. त्यामुळे तो देखील टी20 वर्ल्डकपसाठी महत्त्वाचा एक दावेदार आहे.

रविंद्र जडेजा

भारताचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा देखील एक पर्याय आहे. परंतु, जडेजाला भारताकडून गेल्या काही महिन्यात टी20 क्रिकेटमध्ये सातत्याने संधी मिळालेली नाही. तो यावर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही संधी मिळाली नव्हती.

अशात त्याला टी२० वर्ल्डकपसाठी संधी दिली जाणार की नाही, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, जडेजाने आयपीएल 2024 मध्ये 6 सामन्यांत 84 च्या सरासरीने 84 धावा केल्या आहेत, तर 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या सहाही सामन्यांत किफायतशीर गोलंदाजी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com