

Sreesanth Ban Revoked
Sakal
KCA Lifts Three Year Ban On Sreesanth: भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला नुकताच मोठा दिलासा मिळाला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने (KCA) त्याच्यावर लावलेली तीन वर्षांची बंदी उठवली आहे. श्रीसंतची कारकिर्द अनेक चढ-उतारांची राहिली आहे. २०१३ मध्ये त्याच्यावर आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयकडून बंदी आली होती. ही ७ वर्षांची बंद २०२० मध्ये संपली. त्यानंतर तो क्रिकेटमध्ये सक्रिय झाला होता.
मात्र गेल्यावर्षी पुन्हा त्याला केरळ क्रिकेट असोसिएशनने ३ वर्षांसाठी निलंबित केले होते. पण त्यानंतर एका वर्षातच त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे.