Kavya Maran celebrates passionately as Sunrisers Hyderabad seal top spot in IPL 2026
esakal
SRH number 1 points table IPL 2026 update: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. SRH च्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना PBKS ने ७ बाद २०२ धावांपर्यंत मजल मारली. कूपर कॉनलीची नाबाद १०७ धावांची खेळी व्यर्थ झाली. सनरायझर्स हैदराबादने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आणि पंजाब किंग्सला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. पण, याची चर्चा राहिली बाजूला, सामन्यानंतर SRH ची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran Celebration) हिच्या सेलिब्रेशनची चर्चा रंगली..