Sachin Tendulkar applauds Vaibhav Sooryavanshi
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator Marathi News: वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफ सामन्याचा इतिहास भूगोल बदलला... सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या या १५ वर्षीय फलंदाजाने दादागिरी दाखवली. त्याने अवघ्या २९ चेंडूंत १२ षटकार व ५ चौकारांसह ९७ धावांची वादळी खेळी केली. आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकाण्यापासून तो थोडक्यात हुकल्याने चाहत्यांना वाईट वाटले. पण, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी वैभवचे कौतुक केले. अभिषेक शर्माने त्याची पाठ थोपटली... त्याचवेळी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही ( Sachin Tendulkar) महत्त्वाची पोस्ट लिहिली.