SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

IPL 2026, SRH vs RR Marathi Cricket News: इशान किशन आणि हेनरिच क्लासन यांनी तुफानी फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली, पण शेवटी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन केले. किशनने ४४ चेंडूत ९१ धावांची खेळी करत मैदान दणाणून सोडले, तर क्लासनने त्याला उत्तम साथ देत दोघांनी ८८ धावांची भागीदारी रचली.
Ishan Kishan AND Heinrich Klaasen DOMINATED EARL

Ishan Kishan AND Heinrich Klaasen DOMINATED EARL

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Marathi Update: इशान किशनने आज हैदराबादचे स्टेडियम दणाणून सोडले. त्याने ४४ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ९१ धावांची खेळी करून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. त्याच्या सोबतीला हेनरिच क्लासन उभा राहिला आणि त्यांच्या ८८ धावांच्या भागीदारीने सनरायझर्स हैदराबादला पुन्हा एकदा दोनशे धावांच्याजवळ पोहोचवले. इशान व क्लासन यांच्यात ऑरेंज कॅपची शर्यत रंगलेली पाहायला मिळाली आणि तुर्तास तरी क्लासनने अव्वल स्थान पटकावले आहे. वैभव सूर्यवंशी फार मागे नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात चांगला मारा करताना पुनरागमन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com