

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेला सुरूवात झाली असून पहिला सामना गॉलला होत आहे. गुरुवारी या सामन्याचा दुसरा दिवस होता. या दिवशी श्रीलंकेच्या पहिल्या डावाच्या सुरुवातीला काही नाट्यमय घडामोडी घडल्याचे दिसले.
ऑस्ट्रेलियाने या सामन्याची सुरुवात दमदार केली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी ६ बाद ६५४ धावांवर पहिला डाव घोषित केला. यानंतर श्रीलंकेचा फलंदाजीला उतरला.