
स्टीव्ह स्मिथ हा कसोटी क्रिकेटमधील दिग्गज का समजला जातो, हे पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलं आहे. स्मिथने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिययशीप २०२३-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास घडवला आहे.
सध्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (११ जून) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्मिथने झुंजार अर्धशतक साकारले. या अर्धशतकी खेळी दरम्यान त्याने अनेक विक्रम केले आहेत.