Sunil Gavaskar suggests India should rest Jasprit Bumrah for IND vs PAK Super 4 to keep him fit for the Asia Cup 2025 final
esakal
आशिया चषक सुपर ४ मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका अशी चार संघ निश्चित झाले आहेत.
भारताचा आज ओमानविरुद्ध सामना होणार असून त्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
सुनील गावस्कर यांच्या मते बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या सुपर ४ सामन्यातही खेळू नये.
Sunil Gavaskar’s Bold Advice: आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ संघ निश्चित झाले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका या संघांमध्ये आता अंतिम फेरीत पोहोचण्याची शर्यत रंगणार आहे. Ind vs Pak यांच्यात रविवारी पुन्हा सामना होणार आहे. त्याआधी आज भारतीय संघ आज अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात ओमानशी भिडणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहला ( Jasprit Bumrah) विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. पण, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्र यांनी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतही जसप्रीतला विश्रांती दिली जावी अशी मागणी केली आहे.