

Sunil Narine | IPL 2026 SRH vs KKR
Sakal
SRH vs KKR IPL 2026 Marathi News: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ स्पर्धेतही त्यांच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना थक्क केलं होतं. मात्र रविवारी (३ मे) घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मात्र त्यांची फलंदाजी ढेपाळल्याचे दिसले.
कोलकाताच्या फिरकी गोलंजाजांच्या जाळ्यात हैदराबादचे फलंदाज अडकल्याचे दिसले. त्यामुळे हैदराबादने कोलकातासमोर १६६ धावांचेच लक्ष्य ठेवले. या सामन्यादरम्यान सुनील नरेनने (Sunil Narine) मोठा विक्रमही केला.