IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

Sunrisers Hyderabad beat Delhi Capitals: सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दमदार विजय मिळवला. हा हैदराबादचा आयपीएल २०२६ मधील चौथा विजय ठरला. या विजयानंतर काव्या मारनही जोरदार सेलिब्रेशन केलं.
Eshan Malinga  SRH vs DC  IPL 2026

Eshan Malinga SRH vs DC IPL 2026

Sakal

Updated on

SRH vs DC Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मंगळवारी (२१ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४७ धावांनी दमदार विजय मिळवला.

हा हैदराबादचा हंगामातील चौथा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे ८ गुण झाले आहेत. हैदराबादच्या विजयात अभिषेक शर्मापाठोपाठ (Abhishek Sharma) इशान मलिंगाने (Eshan Malinga) मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर सनरायझर्स हैदराबादने २४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकात ९ बाद १९५ धावांच करता आल्या. या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादची संघमालकीण काव्या मारन (Kavya Maran) अत्यंत खूश होती. तिने आनंदाने सेलिब्रेशनही केले. या विजयासह हैदराबादने पाँइंट्स टेबलमध्ये तिसरे स्थानही मिळवले.

Eshan Malinga  SRH vs DC  IPL 2026
IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com