

Abhishek Sharma | SRH vs DC | IPL 2026
Sakal
SRH vs DC Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL) मंगळवारी (२१ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादचा सामना घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) संघात झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माकडून (Abhishek Sharma) स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने या सामन्यात शतक करताना अनेक विक्रमांना (Records) गवसणी घातली.
या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून (SRh) अभिषेकने ट्रॅव्हिस हेड (३७), इशान किशन (२५) आणि शेवटी हेनरिक क्लासेन (नाबाद ३७) यांच्यासह फलंदाजी करताना ६८ चेंडूत १० चौकार आणि १० षटकार मारत नाबाद १३५ धवा केल्या. हे त्याचे आयपीएलमधील दुसरे, तर टी२० क्रिकेट कारकिर्दीतील ९ वे शतक ठरले. त्याच्या शतकामुळे हैदराबादने २० षटकात २ बाद २४२ धावा केल्या.