
इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा १८ वा हंगाम नुकताच मे महिन्यात संपला. आता १९ वा हंगामाला अद्याप किमान ८ महिने तरी आहेत. पण असे असले तरी सनरायझर्स हैदराबादने संघाबाबत मोठा बदल केला आहे.
आयपीएल २०२४ मध्ये उपविजेतेपदावर हैदराबादला समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मात्र आयपीएल २०२५ मध्ये संघाकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. पहिल्या सामन्यात सर्वात मोठी धावसंख्या केल्यानंतरही नंतर संघाला बराच संघर्ष करावा लागला. स्पर्धा संपण्याच्या अखेरीस हैदराबादला फॉर्म मिळाला होता, पण तोपर्यंत त्यांचे आव्हान संपले होते.