CSK विरूद्धच्या सामन्याआधी काव्या मारनच्या SRH चा मोठा निर्णय! स्टार खेळाडूला दिली संघात एन्ट्री

SRH announced Injury Replacement: सनरायझर्स हैदराबाद संघाला आज चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याआधी हैदराबादने एका खेळाडूला २ कोटींमध्ये संघात दाखल करून घेतले आहे.
Sunrisers Hyderabad

Sunrisers Hyderabad

Sakal

Updated on

IPL SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा (IPL 2026) रंगू लागली असून सर्वच संघात कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. मात्र, यादरम्यानच अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसला आहे. यात सनरायझर्स हैदराबादचाही (Sunrisers Hyderabad) समावेश आहे.

सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू डेव्हिड पेन यंदाच्या आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे हैदराबादने बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

डेव्हिड पनने (David Payne) या हंगामात दोन सामने खेळताना २ विकेट्स घेतल्या होत्या. पण त्याला घोट्याला दुखापत झाल्याने उर्वरित आयपीएल २०२६ हंगामातून बाहेर व्हावे लागले आहे, याबाबत सनरायझर्स हैदराबादने माहिती दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Sunrisers Hyderabad</p></div>
IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा झंझावात की दिल्ली कॅपिटल्सचा पलटवार? आजचा सामना ठरणार थरारक, कशी असेल Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com