Suryakumar Yadav | India vs USA | T20 World Cup 2026

Suryakumar Yadav | India vs USA | T20 World Cup 2026

Sakal

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध संकटमोचक ठरलेल्या कर्णधार सूर्यकुमारचा मोठा विक्रम; विराट कोहली, बाबर आझमला टाकलं मागे

Suryakumar Yadav Record: टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अमेरिकेविरुद्ध ८४ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी विक्रमी ठरली आहे.
Published on

Suryakumar Yadav Fifty Record: टी२० वर्ल्ड कप २०२६ चा पहिलाच सामना भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने गाजवला. शनिवारी (७ फेब्रुवारी) भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. हे स्टेडियम सूर्यकुमारचे (Suryakumar Yadav) घरचे मैदान असून त्याने घरच्या प्रेक्षकांसमोर दरमदार खेळही केला आणि मोठा विक्रमही केला आहे.

या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पण दुसऱ्या षटकात सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर ६ व्या षटकात भारताने इशान किशन (२०), तिलक वर्मा (२५) आणि शिवम दुबे (०) यांच्या विकेट्स गमावल्या.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav | India vs USA | T20 World Cup 2026</p></div>
T20 WC, IND vs USA: ६ ओव्हर, ४ विकेट्स! भारताला पॉवरप्लेमध्ये अमेरिकेने दिले मोठे धक्के; अभिषेक शर्मा, शिवम दुबे पहिल्याच बॉलवर आऊट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com