

India vs USA | T20 World Cup 2025
Sakal
India batting collapse against USA in T20 World Cup: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला शनिवारपासून (७ फेब्रुवारी) सुरूवात झाली असून भारत आणि अमेरिका संघात मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू आहे. या सामन्यात अमेरिकेचे गोलंदाज पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीवर वरचढ ठरल्याचे दिसत आहे. भारताने ६ षटकातच ४ विकेट्स गमावल्या.
या सामन्यात अमेरिकेचा (USA) कर्णधार मोनांक पटेलने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. भारताकडून (Team India) नवी सलामी जोडी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी डावाची सुरुवात केली.