

Suryakumar Yadav on Abhishek Sharma Availability For IND vs PAK
Sakal
Suryakumar Yadav on Abhishek Sharma Availability For IND vs PAK : भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील नामिबियाविरुद्धचा सामनाही अभिषेक खेळला नव्हता. त्यामुळे तो १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध कोलंबोमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह होते.
आता याबाबत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेच (Suryakumar Yadav) उत्तर दिले आहे. सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) तंदुरुस्त असून खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यासोबतच पाकिस्तानच्या कर्णधारानेच्या व्यक्तव्यांवरही उत्तर दिले आहे.