T20 World Cup: पाकिस्तानचा बहिष्कार तरी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार; जाणून घ्या त्यामागचं गणित

Team India to Reach Colombo for Pakistan Match: पाकिस्तानने टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण यावर बीसीसीआयची भूमिका काय आहे, जाणून घ्या.
Team India

Team India

Sakal

Updated on

Team India to Reach Colombo for Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून असून त्याचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांवरही झालेला दिसत आहे, यात क्रिकेटचाही समावेश आहे. आता भारत विरुद्ध पाकिस्तान हा टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील सामना होण्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आशिया कप २०२५ स्पर्धेनंतर या दोन संघात होणाऱ्या सामन्याला वेगळेच वळण मिळाले आहे. या स्पर्धेत तीनवेळा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमने-सामने आले होते. त्यावेळी पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय संघाने पाकिस्तान संघासोबत हस्तांदोलन करणे टाळले होते. याशिवाय दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये कोणत्याच प्रकारचे संभाषणही झाले नव्हते.

<div class="paragraphs"><p>Team India</p></div>
T20 World Cup वादात शाहिद आफ्रिदीची एन्ट्री! पाकिस्तान संरकारच्या सपोर्टमध्ये उतरला, ICC ला दिले आव्हान...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com