Suryakumar Yadav reaction after winning T20 World Cup
esakal
India World Champion: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेते जेतेपद कायम राखण्याचा पराक्रम केला.. आतापर्यंत एकाही संघाला सलग दोन पर्वात वर्ल्ड कप जिंकता आला नव्हता.. भारताच्या २५५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १५९ धावांवर तंबूत परतला. यापूर्वी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध ( IND vs NZ ) भारताला तिन्ही सामन्यात हार पत्करावी लागली होती, परंतु आज सूर्यकुमार यादवच्या संघाने इतिहास बदलण्याचा... इतिहास घडवण्याचा केलेला निर्धार पूर्ण केला. भारताने ९६ धावांनी सामना जिंकून सर्वाधिक तीन वेळा वर्ल्ड कप उंचावण्याचाही पराक्रम केला. ४ विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला, तर संजू सॅमसनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.